Land Record 2024 : 1880 पासूनचे सर्व जुने सातबारा उतारा फेरफार खाते उतारा ऑनलाइन डाउनलोड करण्याची प्रक्रिया.
सर्वप्रथम आपल्याला महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
Land Record 2023
अधिकृत वेबसाईट/संकेतस्थळ
१) या वेबसाईट वर पहिल्यांदा नवीन वापरकर्ता नोंदणी करण्यासाठी “New User Registration” पर्यायावर क्लिक करा. Land Record 2024
२) एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. या फॉर्ममध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती भरायची आहे.यामुळे तुमचे नाव, मधले नाव, आडनाव, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर, व्यवसाय, ईमेल आयडी, जन्मतारीख इत्यादी गोष्टी ची नोंद करायचे आहे.
Land Record 2024
३) वैयक्तिक माहिती भरून झाली की तुम्हाला तुमच्या पत्त्या विषयीची माहिती द्यायची आहे. यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक, इमारतीचे नाव पिनकोड, स्थान, शहर, जिल्हा, राज्य इत्यादींची माहिती द्यायची असते.
४) हे भरून झाल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन आयडी बनवायचा आहे. यानंतर तुमच्या समोर वापर करता नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे असा मेसेज येईल.
५) त्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे. आता आपण जुना फेरफार उतारा कसा पाहायचा ते पाहू.
आपला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन केल्यानंतर आता आपण सातबारा फेरफार उतारा आणि खाते उतारा कसा पाहायचा हे पाहूया.
१) वेबसाईटवर सात जिल्ह्यांपैकी एक जिल्हा निवडा. पुढे तालुका, गावाचं नाव आणि अभिलेख प्रकार, फेरफार उतारा, सातबारा,आठ-अ असे पर्याय निवडा. असे जवळपास 58 अभिलेखांचे प्रकार यात उपलब्ध आहेत.
२) यानंतर गट क्रमांक टाका व ‘शोध’ या पर्यायावर क्लिक करा. Land Record 2023
३) यानंतर शोध निकाल या पेजवर तुम्ही टाकलेल्या गट क्रमांकाशी संबंधित फेरफाराची माहिती दिसते.
४) फेरफाराचं वर्ष, क्रमांक दिलेला असतो. त्यावर क्लिक करून संबंधित वर्षाचा फेरफार पाहा.
५) त्यानंतर पुनरावलोकन कार्ट या पर्यायावर क्लिक करा.
६) त्यानंतर तुमचं कार्ट ओपन होईल. त्याखाली असलेल्या “पुढे जा’ या पर्यायावर क्लिक केलं की “डाउनलोड सारांश’ पेज ओपन होईल.
७) इथं” तुमच्या फाइलची सद्य: स्थिती उपलब्ध आहे’ असे दिसेल.
८) त्यासमोरील “फाइल पाहा’ या पर्यायावर क्लिक केलं की फेरफार पत्रक ओपन होईल.