बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ६०० अप्रेंटिस पदासाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही bankofmaharashtra.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२४ आहे.
ज्या तरुणांचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले आहे आणि त्यांना कामाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच त्या व्यक्तीला त्याच राज्याच्या/केंद्रशाशित प्रदेशातील स्थानिक भाषा यायला हवी.२० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.