त्याव्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसालेयांचा समावेश आहे.
जर तुम्ही रेशन कार्डसाठी पात्र असाल आणि अजूनही रेशन कार्ड काढले नसेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या जवळच्या अन्न व पुरवठा विभागाच्या कार्यालयात जावे लागेल. तसेच अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील अर्ज डाउनलोड करू शकता.
तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करावी लागेल. यासोबतच तुमच्याकडून संबंधित कागदपत्रे मागितली गेली असतील तेही अर्जासोबत जोडावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज आणि संबंधित कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या रेशनिंग कार्यालयात जमा करावी लागतील.