सध्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेत शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन श्रेणी आहेत. ज्या अंतर्गत कर्ज दिले जाते. आता तरुण प्लस नावाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. मुद्रा शिशु योजनेंतर्गत 50,000 रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. किशोर योजनेअंतर्गत व्यवसाय करणाऱ्यांसाठी ५०,००० ते ५ लाख रुपयांपर्यंतचे मुद्रा कर्ज दिले जाते.
तरुण योजनेंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा नियम आहे. तरुण योजनेंतर्गत घेतलेले कर्ज यशस्वीरीत्या परत केलेल्या व्यावसायिकांना आता त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी तरुण प्लस श्रेणी अंतर्गत 10 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे. त्यामुळे आता उद्योजकांना आपला व्यवसाय वाढविण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.