• सर्वात पहिल्यांदा पीएम किमान योजनेची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in ला भेट द्या.
  • होम पेजवर Farmer Corner सेक्शनमध्ये ई-केवायसी पर्याय निवडा
  • पुढे ई-केवायसी पेजवर जाऊन आपला 12 अंकी आधार नंबर नोंदवा.
  • यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा.
  • आता आपला रजिस्टर्ड मोबाइल नंबर नोंदवावा लागेल.
  • नंबर टाकताच मोबाईलवर ओटीपी येईल. तो इथे टाका.
  • ओटीपी टाकल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा.
  • असे केल्यास तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
  • ही माहिती देणारा मॅसेज तुमच्या मोबाईलवर येईल.

मोदी सरकारने २०१९ मध्ये पीएम किसाम सन्मान निधी या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये मिळतात. पीएम किमान निधीचे आतापर्यंत १७ हप्ते मिळाले आहे. आता १८व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुढील हप्ता ऑक्टोबर २०२४ मध्ये मिळण्याची शक्यता आहे. अद्याप याची अधिकृत सूचना देण्यात आलेली नाही