इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार एलपीजीच्या किमतीमध्ये करण्यात आलेली वाढ ही आजपासून लागू झाली आहे. या वाढीनंतर राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्ययावसायिक सिलेंडरची किंमत ही १६९१.५० रुपये एवढी झाली आहे. तर मुंबईमध्ये १९ किलो वजनाच्या व्यावसासिक सिलेंडरची किंमत ही १६०५ रुपयांवरून वाढून १६४४ रुपये एवढी झाली आहे. कोलकात्यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा दर १७६४.५० रुपयांवरून वाढून १८०२ रुपये झाला आहे. तर चेन्नईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडर हा १८१७ रुपयांऐवजी १८५५ रुपयांना मिळणार आहे.
दरम्यान, याआधी ऑगस्ट महिन्यामध्येही एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती. तेव्हा १९ किललो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत ८.५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती.