केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलत कॉन्स्टेबल फायरमन या पदावर नेमणूक झाल्यानंतर उमेदवाराला दर महिना २१,७०० ते ६९,१००/- इतके वेतन दिले जाईल. परंतु या भरतीसाठी ठराविक वयोमर्यादा लागू होईल. वय वर्ष १८ ते २३ वर्षे या वयोगटातील तरुणच या भरतीत सहभागी होऊ शकतात. ओबीसी वर्गातील उमेदवारांना या वयोमर्यादित तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे. एससी आणि एसटी वर्गातील उमेदवारांना अधिक पाच वर्षांची सूट मिळेल. भारतातील इतर राज्यांमध्ये, कोणत्या ठिकाणी किती पदांसाठी भरती आहे, हे जाणून घेण्यासाठी तसेच सीआयएसएफ म्हणजेच सेंटर इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सबद्दल सविस्तर माहिती वाचण्यासाठी https://www.cisf.gov.in/ या त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल.