महिलांची दिवाळी होणार गोड.! लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पुन्हा होणार 3 हजार रुपये जमा October 2, 2024 by News नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे, हा अजितदादांचा वादा आहे.” असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.महायुतीतील नेते आपल्या सभांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करत आहेत. हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेनंतर महिलांना मोफत सिलेंडर वाटप झाले सुरू अशातच आज बीडमधील सभेत अजित पवार यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे, हा अजितदादांचा वादा आहे, असं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे जर हे तीन हजार बहिणींना सरकारने दिले तर त्यांची दिवाळी आणखी गोड होणार यात शंका नाही.दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हफ्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. राज्य सरकारने ऐन रक्षाबंधन सणाच्या आधी महिलांच्या बँक खात्यात या योजनेच्या दोन हफ्त्यांचे 3000 रुपये जमा केला होते. हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेनंतर महिलांना मोफत सिलेंडर वाटप झाले सुरू त्यानंतर, सप्टेंबर महिन्याचे पैसे 29 सप्टेंबर रोजी जमा करण्यात आला आहे. तर आता दिवाळीला देखील महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होणार असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.