कर्जासाठी अर्ज करताना ही कागदपत्रे आवश्यक असतील:
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. मागील 2 वर्षांचे बँक स्टेटमेंट
4. मागील 3 महिन्यांची पगार स्लिप
5. फॉर्म 16
6. पासपोर्ट आकाराचा फोटो
बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्जासाठी पात्रता
बँक ऑफ बडोदाकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
तुमचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
तुमचा CIBIL स्कोअर 730 पेक्षा जास्त असावा.
कर्जाची रक्कम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्ही कमी व्याजदरात जास्त कर्ज घेऊ शकता.
तुमचे मासिक उत्पन्न किमान 15 हजार रुपये असावे.
अर्ज करण्यापूर्वी तुमचे आधार कार्ड, मोबाईल आणि पॅन कार्ड लिंक असल्याची खात्री करा.
तुमचे बँक खाते बँक ऑफ बडोदामध्ये असावे.