दरवर्षी एक लाख मुलींना संरक्षणाचे शिक्षण देखील देण्यात येणार आहे. अशी चंद्रकांत पाटील यांनी दुसरी घोषणा केलेली आहे. या नंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आणि या दोन घोषणांविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.

या योजनांबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “दोन गोष्टी आहेत. आज 5000 मुलींना लाठी काठीचा प्रशिक्षण दिल्यानंतर मी एक लाख मुलींचं टार्गेट मारणारी घोषणा केली. या लाठीकाठी शिकलेल्या 100 मुलींना मी दर महिन्याला दहा हजार रुपये मानधन देणार आहे. हे मानधन घेऊन त्या मुली दिवसभर कॉलेज वगैरे करतील. आणि संध्याकाळी दोन तास त्यांच्या परिसरातील मुलींना लाठीकाठी शिकवतील आता 27 मिनिटाची एक डॉक्युमेंटरी 600 खेळाडूंवर आली आहे. त्यांना पारितोषिक मिळाले आहेत कोल्हापूरच्या तरुणांनी ती केलेली आहे
आणि आता कोल्हापूरच्या गल्लीबोलांमध्ये सर्वांचे हातात काठात असतात. त्यामुळे ही घोषणा केलेली आहे.”