लाडकी बहिणींसाठी शिंदे सरकारने घेतला दिवाळी अगोदर हा मोठा निर्णय October 14, 2024 by News नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने यावर्षी राज्यातील महिलांसाठी एक मोठी स्कीम सुरु केली आहे. त्या योजनेचं नाव लाडकी बहीण योजना असं आहे. ही योजना सध्या तुफान चर्चेत आहे. याअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात 1500 रूपये प्रतिमहिना असे मिळून जुलैपासून अॅडव्हान्स नोव्हेंबरपर्यंतचे 5 हफ्ते जमा झाले आहेत. हे सुद्धा वाचा:- दिवाळी अगोदर या महिलांच्या खात्यात होणार 7500 हजार रुपये जमा पण काही महिला या योजनेपासून अजूनही वंचित आहेत त्यांच्यासाठी ही खास बातमी आहे. कारण आता अर्जाच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात येतेय. महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही नवीन मुदत दिली आहे. हे सुद्धा वाचा:- दिवाळी अगोदर या महिलांच्या खात्यात होणार 7500 हजार रुपये जमा यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती.लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी याआधी 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत मुदत दिली होती. परंतु त्यानंतर ती वाढवून 31 ऑगस्ट 2024 करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढवून 30 सप्टेंबर केली. आता तिसऱ्यांदा मुदत वाढवण्यात आली असून महिलांना 15 ऑक्टोबरपर्यंत अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज भरता येणार आहेत.