१२वी पास तरुणांसाठी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. उत्तर प्रदेशमधील जिल्ह्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. बाल विकास परियोजना कार्यालयाअंतर्गत डिस्ट्रिक्ट प्रोग्राम ऑफिसर पदांसाठी भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी महिलांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.या नोकरीसाठी एकूण ४९७ पदांवर भरती केली जाणार आहे. त्यातील गोंडा येथे २४३ पदे रिक्त आहे. देवरिया येथे २५४ पदे रिक्त आहेत. या नोकरीसाठी उमेदवार ९ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी पास केलेली असावी.या नोकरीसाठी १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. नोकरीसाठी तुम्ही balvikasup.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.