शेतकऱ्यांना मिळणार पुन्हा 1 रुपयामध्ये मध्ये पिक विमा या तारखेपासून होणार अर्ज प्रक्रिया सुरू

नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे, खरीप हंगामाप्रमाणे रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा मिळणार आहे. राज्य सरकारने 2023 मध्ये खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा निर्णय घेतला होता.

 

हे सुद्धा वाचा:-  सरकार करणार नागरिकांच्या खात्यात  36 हजार रुपये जमा असा करा अर्ज

1 नोव्हेंबरपासून पीक विमा काढण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. हरभरा, गहू, कांदा आणि ज्वारी या रब्बी पिकांचा विमा काढता येणार आहे. मागील वर्षी एकूण 71 लाख 41 हजार शेतकऱ्यांनी पीक विम्याची नोंदणी करून 49 लाख 45 हजार हेक्टरवरील पिकांचा विमा उतरवला होता. त्यामध्ये एकूण हप्ता 2 हजार 98 कोटी रुपयांचा होता. 2022 च्या तुलनेत 1 रुपयामध्ये पीक विमा उपलब्ध करून दिल्यामुळे 10 पट वाढ झाली होती. तर नैसर्गिक संकटामुळे झालेल्या 4 लाख 60 हजार शेतकऱ्यांना 438 कोटी 27 लाख रुपयांची भरपाई देण्यात आली होती.मात्र यावर्षी पाऊस पाणी चांगला झाल्यामुळे यामध्ये आणखी 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशी माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा:-  सरकार करणार नागरिकांच्या खात्यात  36 हजार रुपये जमा असा करा अर्ज

 

पीक विम्यासाठी लागणारी रक्कम राज्य सरकार भरणार आहे. त्याच बरोबर कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना यामध्ये सहभाग घेता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत ज्वारी पिकाची नोंदणी करता येणार आहे. तर इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गहू,ज्वारी, हरभरा, रब्बी, गहू आणि कांदा या पिकासाठी 15 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर उन्हाळी भुईमूग, उन्हाळी भात या पिकांसाठी 31 मार्च 2025 पर्यंत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे.

Leave a Comment