अनेक राज्यांमध्ये सरकार 200 युनिटपर्यंत मोफत वीज देत आहे. या योजनेअंतर्गत एका महिन्यात 200 युनिट किंवा त्यापेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांना बिल भरण्याची गरज भासणार नाही. तसेच एखादा ग्राहक 200 युनिटपेक्षा जास्त वीज वापरत असेल, तर त्याला फक्त 200 युनिटपेक्षा जेवढे युनिट जास्त झाले आहे, तेवढ्याच युनिटचे बिल भरावे लागेल. या योजनेचा थेट फायदा लाखो ग्राहकांना होईल.