सरकारचा मोठा निर्णय.! या नागरिकांचे रेशन वितरण होणार आता कायमचे बंद September 7, 2024 by News नमस्कार मित्रांनो जिल्हा धान्य वितरण कार्यालयाने नवीन रेशनकार्ड वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे फक्त ऑनलाइन पद्धतीने (आधार कार्डप्रमाणे) रेशनकार्ड मिळेल. रेशनकार्ड बंद झाले तरी पिवळे, केशरी कार्डधारकांना मिळणाऱ्या सुविधा सुरूच राहतील हे सुद्धा वाचा:- या नागरिकांना मिळणार एसटी बस मध्ये मोफत प्रवास .मात्र, यापुढे अस्तित्वात असलेल्या रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, कमी करणे यासारखी दुरुस्तीची कामे ऑफलाइन पद्धतीनेच होतीलजिल्ह्यात पिवळे, केशर व पांढरे (शुभ्र) रेशनकार्ड धारकांची एकूण संख्या १५ लाख ५८ हजार आहे. रास्त भाव दुकानदारांमार्फत त्यांना धान्य वितरण केले जाते. राज्यात एकूण ५२ हजार ५३२ रास्तभाव दुकानदार आहेत. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब रेशनकार्डधारकांना आनंदाचा शिधा दिला जातो. पिवळे व केशरी रेशनकार्ड धारकांना राज्य सरकारने उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट दिली होती. त्यामुळे जिल्ह्यात दोन महिन्यांत तब्बल १६ हजार रेशनकार्डमध्ये दुरुस्ती करण्यात आली.