मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिली खुशखबर.! बळीराजासाठी मोदी सरकारने घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय September 14, 2024 by News नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे निर्यातमार्ग खुल्या पद्धतीनं उपलब्ध होतील, आणि त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीचा अधिक फायदा मिळू शकेल. कांद्याच्या किमान निर्यात मूल्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकरी आता थेट परदेशात कांदा निर्यात करू शकतील. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात यथे यादी तपासा याआधी सरकारने कांद्याच्या दरातील अस्थिरतेला आळा घालण्यासाठी निर्यात मर्यादित केली होती, ज्यामुळे देशांतर्गत किंमती नियंत्रित राहतील. मात्र, यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळत नव्हता.आता मोदी सरकारच्या निर्णयामुळे कांदा निर्यात सोपी झाली आहे. आता, MEP हटवल्यामुळे कांद्याच्या निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर लाभ होईल. विशेषतः कांद्याची मोठी मागणी असलेल्या खाडी आणि आशियाई देशांमध्ये याचा मोठा फायदा होणार आहे. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात यथे यादी तपासा