‘ओडिशासाठी मोदींची हमी’ अंतर्गत सुभद्रा योजना हे भाजपच्या जाहीरनाम्यातील प्रमुख वचन होतं. मोदींची हमी या प्रचाराने भाजपने या वर्षी जूनमध्ये राज्यात प्रथमच स्वबळावर सरकार स्थापन केलं. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपनं ही योजना लागू करण्याची घोषणा केली होती. सरकारच्या मते, २१ ते ६० वर्षे वयोगटातील एक कोटी महिलांना पाच वर्षांत ५०,००० रुपयांची रोख मदत द्यायची आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने ५५००० कोटी रुपयांच्या खर्च केलाय.