या तारखेपासून राज्यात पडणार जोरदार मुसळधार पाऊस पंजाबराव डक यांचा मोठा अंदाज

नमस्कार मित्रांनो चार पाच दिवसांपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहील, मात्र २१ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे,

तो सप्टेंबरच्या शेवटपर्यंत कायम राहील.विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक असेल. विशेषतः नांदेड, लातूर, परभणी, पुणे, कोल्हापूर, सांगली या भागांमध्ये २ ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे पैसे सप्टेंबर महिन्याच्या या तारखेला येणार 

. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.डख यांनी शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. उडीद, सोयाबीन यासारखी पिके तयार झाल्यास ती लवकर काढण्याची शिफारस त्यांनी केली आहे, कारण पुढील ११ दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहील. तसेच ५ नोव्हेंबरपासून राज्यात थंडीची सुरुवात होईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे पैसे सप्टेंबर महिन्याच्या या तारखेला येणार 

 

Leave a Comment