लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी आणखी एक योजना मिळणार 8 लाख रुपये येथे बघा अर्ज प्रक्रिया September 22, 2024 by News नमस्कार मित्रांनो देशातील महिलांना आठ लाख रुपयांचा फायदा मिळणार आहे. सरकारच्या ड्रोन दीदी योजनेअंतर्गत या वर्षी अनेक राज्यांतील 3000 महिला बचत गटांना (SHGs) ड्रोन विमानं दिली जाणार आहेत. हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये होणार खात्यात जमा येथे बघा अर्जप्रकिया यासाठी महिला बचत गटांना सर्व आवश्यक कागदपत्रं जमा करावी लागतील. या योजनेअंतर्गत देशभरातील एकूण 14500 बचतगटांना ड्रोन दिली जाणार आहेत.कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, योजनेचा ड्राफ्ट तयार झाला आहे. वर्षातील उर्वरित तीन महिन्यांत 3000 ड्रोनचं वाटप करण्यात येणार आहे. या महिनाअखेरीस यासंबंधी आदेश राज्यांना दिले जातील, त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल. या योजनेसाठी ठेवलेल्या अटींनुसार, सर्वात जास्त ड्रोन उत्तर प्रदेशमधील गटांना दिली जातील. यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर असेल.कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन पॅकेजची संभाव्य किंमत 10 लाख रुपये असेल हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये होणार खात्यात जमा येथे बघा अर्जप्रकिया . या 10 लाख रुपयांच्या ड्रोनसाठी महिला बचतगटांना 8 लाख रुपयांचे अनुदान (80 टक्के) आणि 2 लाख रुपये (20 टक्के) कर्ज मिळेल. सध्या देशभरात 10 कोटी महिला बचतगटांच्या सदस्य आहेत.ड्रोनबरोबर चार अतिरिक्त बॅटरी, चार्जिंग हब, चार्जिंग करण्यासाठी जेनसेट आणि ड्रोन बॉक्स असेल. त्याचबरोबर ड्रोन उडवणाऱ्या महिलेला ड्रोन पायलटचं डेटा विश्लेषण आणि ड्रोनची देखभाल करण्यासाठी ट्रेनिंग दिलं जाईल तसंच आणखी एका महिलेला को-पायलट म्हणून ट्रेनिंग दिलं जाईल. 15 दिवसांचं ट्रेनिंग याच पॅकेजमध्ये असेल. यामध्ये महिलांना ड्रोनचा वापर करून विविध कृषी कामं करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल