धुळे जिल्ह्यात प्राधान्य गट कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या ९५ हजार ८०२ इतकी आहे. या लाभार्थ्यांना दरमहा प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य मिळते. केंद्र शासनाने यंदा भरडधान्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली आहे. त्यामुळे यंदा रेशन दुकानात गव्हासोबत ज्यारीदेखील मिळणार आहे. दैनंदिन आहारात कडधान्यांचा वापर व्हावा आणि आरोग्यासाठी पौष्टिकता लाभावी, यादृष्टीने रेशनकार्डधारकांसाठी दिवाळीपर्यंत ज्वारी देण्यात येणार आहे.शासनाने शेतकरी बांधवांकडून यंदा हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारीची खरेदी केली असून, गव्हासोबत लाभार्थ्यांना ज्वारीचेही वाटप केले जाणार आहे. मात्र, रेशनमध्ये गहू मिळणारच आहे. गहू बंदकरण्यात आलेला नाही. तसेच ज्वारीही आरोग्यासाठी पौष्टिक असल्यामुळे, यानिमित्ताने आहारात कडधान्याचाही वापर वाढण्यास मदत होणार