नागरिकांसाठी मोठी बातमी.!1 आक्टोंबर पासून देशात लागू होणार हे नवीन नियम September 28, 2024 by News नमस्कार मित्रांनो ऑक्टोबरपासून देशात अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.यामध्ये LPG सिलेंडरच्या किमतीपासून ते क्रेडिट कार्ड आणि सुकन्या समृद्धी योजनेतील बदलांचा समावेश आहे हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा . या बदलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG सिलिंडरच्या किमती बदलत असतात. त्यामुळे 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून नवीन किमती लागू केल्या जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत अनेक बदल झाले होते, मात्र 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नव्हता. हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये महिलांच्या खात्यात जमा तुम्ही देखील HDFC बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. बॅंकेच्या काही क्रेडिट कार्डसाठी लॉयल्टी प्रोग्राम बदलण्यात आला आहे. HDFC बँकेने SmartBuy प्लॅटफॉर्मवरील Apple उत्पादनांसाठी रिवॉर्ड पॉइंट्स रीडिम करण्याचा कालावधी बदलला आहे. हा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहे.केंद्र सरकारद्वारे मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित एक मोठा नियम बदलण्यात आला आहे. आता केवळ मुलींचे कायदेशीर पालक ही मुलींची खाती ऑपरेट करू शकतात. नवीन नियमानुसार, जर मुलीचे SSY खाते एखाद्या व्यक्तीने उघडले असेल जो तिचा कायदेशीर पालक नाही, तर त्याला हे खाते नैसर्गिक पालक किंवा कायदेशीर पालकांकडे हस्तांतरित करावे लागेल. तसे न केल्यास ते खाते बंद केले जाऊ शकते. हा बदल 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहे.