लाडकी बहीण योजनेनंतर महिलांना मोफत गॅस सिलेंडर वाटप सुरू इथे बघा अर्ज प्रक्रिया October 1, 2024 by News नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपल्या भागातील गॅस वितकरकांकडे अर्ज सादर करावा. त्यामुळे येत्या काळात लाभार्थीं महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा इथे बघा यादीत नाव .प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसह ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याची ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजना राबविण्यात येत आहे.त्यामध्ये २७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात १ लाख १८ हजार ७३७ ‘लाडक्या बहिणीं’ना मोफत गॅस सिलिंडरचा आधार मिळाला असून, उर्वरित १७ हजार ६४४ महिला लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडरचे वितरण अद्याप बाकी आहे.गेल्या ३० जुलै रोजीच्या राज्य शासनाच्या निर्णयानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वर्षभरात तीन गॅस सिलिंडर मोफत उपलब्ध करून देण्याची ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजना। राबविण्यात येत आहे.प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ३६ हजार ३८१ महिला लाभार्थी असून, त्यापैकी २७ सप्टेंबरपर्यंत १ लाख १८ हजार ७३७ महिला लाभार्थी महिलांच्या कुटुंबांना ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजनेंतर्गत मोफत गॅस सिलिंडरचा लाभ देण्यात आला. हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा इथे बघा यादीत नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना मोफत गॅस सिलिंडरचा लाभ देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी मोफत गॅस सिलिंडरच्या लाभासाठी संबंधित गॅस सिलिंडर वितरकाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे,