शेतकऱ्यांना मोठा दिलासा.! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खातात या दिवशी होणार रक्कम जमा October 3, 2024 by News नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने अनुदान वाटप, नुकसान भरपाई वाटप आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी, प्रचार-प्रसिद्धीसाठी निधींची तरतूद करण्यात येत आहेत हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहीण योजनेचे 4500 रुपये मिळणार नाही या महिलांना .तर यावर्षीच्या जुले व ऑगस्ट या दोन महिन्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता शासनाने निधी मंजूर केला आहे.दरम्यान, यंदा मान्सूनच्या पावसाने दमदारपणे हजेरी लावली पण जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये खरिपातील पिकांचे आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने १३८ कोटी ५५ लाख ४८ हजार रूपयांचे वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या तीन हेक्टरच्या मर्यादेत या अनुदानाचे वाटप करण्यात येणार असून डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थेट मदतीचा लाभ मिळणार आहे.ही मदत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, कोणत्या पिकांच्या नुकसानीसाठी आणि किती शेतकऱ्यांना मिळणार याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याने दिलासा मिळणार आहे.