रेशन कार्ड हरवले तर मिळणार आता तुम्हाला मोफत ई- रेशनकार्ड अशाप्रकारे करा घरबसल्या डाउनलोड September 5, 2024 by News नमस्कार मित्रांनो केंद्र व राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या रेशन कार्ड योजनेचा फायदा कित्येक गरीब कुटुंबीयांना होत आहे. आता जुने रेशन कार्ड हरवल्यास त्या जागी ई- रेशन कार्ड सुरू करण्यात आले. त्यामुळे आता लाभार्थ्यांना ई- रेशन कार्डद्वारे धान्य खरेदी करता येणार आहे. ई- रेशन कार्डमुळे कार्डमधील नाव कमी करणे, नोंदवणे, ट्रान्सफर करणे, अशी कामे करण्यासही मदत होणार आहे. राज्यात ई- रेशन कार्ड प्रणाली सुरू करण्यात आली. पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने सर्व रेशन कार्ड ई- कार्डमध्ये रूपांतरित करण्याची तयारी झाली. यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली. पुरवठा विभागात प्रायोगिक स्तरावर या प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार नवीन रेशन कार्ड शिधापत्रिका हरवल्यास डुप्लिकेट शिधापत्रिका बनवण्यासाठी एक ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. रेशन दुकान किंवा अन्न विभाग कार्यालय किंवा किओस्क सेंटरमधून अर्ज मिळेल. दिलेल्या लिंकवरून डुप्लिकेट रेशन कार्ड ऑनलाइन बनवण्यासाठी अर्ज डाउनलोड करू शकता. रेशन कार्ड डुप्लिकेट फॉर्म पीडीएफ हा फॉर्म फूड सेफ्टी पोर्टलवर मिळवू शकता. अर्ज प्राप्त केल्यानंतर, तो अर्ज काळजीपूर्वक भरा. रेशन कार्ड क्रमांक, शिधापत्रिकेत नोंद केलेले कुटुंबप्रमुखाचे नाव, वडील व आईचे नाव, मोबाइल नंबर इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी. इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार नवीन रेशन कार्ड