नमस्कार मित्रांनो दिवाळीचा सण जवळ आला, तरी बाजारात अद्याप खरेदीचा उत्साह दिसत नाही. अपेक्षित मागणी नसल्यामुळे साखरेच्या दरात क्विंटलमागे 25 रुपयांनी घट झाली. खाद्यतेलांच्या दरातही 15 किलोमागे 25 ते 30 रुपयांनी घट झाली.मात्र, गव्हाचे दर वाढल्यामुळे रवा आणि मैद्याच्या दरात 50 किलोमागे 25 रुपयांनी वाढ झाली आहे.
हे सुद्धा वाचा:- रेशनकार्ड असेल तर तुमच्या मुलीच्या खात्यात होणार 1 लाख रुपये जमा
अपेक्षित मागणी नसल्यामुळे आणि नव्या तेलबियांची आवक वाढत असल्यामुळे खाद्यतेलाच्या दरात नरमाई आहे. सोयाबीन, तसेच भुईमूग शेंगेची आवक सुरू झाली असून, पावसाच्या उघडिपीमुळे आवक वाढत आहे.त्यामुळे खाद्यतेलांचे दर कमी होण्यास मदत झाली. शेंगदाणा तेलासह अन्य सर्वच खाद्यतेलांचे दर गेल्या आठवड्यात 15 किलो/लिटर च्या डब्यामागे 25 ते 30 रुपयांनी कमी झाले. खोबरेल तेलाचे दर स्थिर होते.
हे सुद्धा वाचा:- रेशनकार्ड असेल तर तुमच्या मुलीच्या खात्यात होणार 1 लाख रुपये जमा
आवक जावक साधारण असल्यामुळे गुळाचे दर स्थिर होते.खाद्यतेले (15 किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2500-2600, रिफाइंड तेलः 2300-2850, सरकी तेल 1900-2200, सोयाबीन तेल 1880-2150, पामतेल 1850-2000, सूर्यफूल रिफाइंड तेल 1900-2000, वनस्पती तूप 1800-2300, खोबरेल तेल 3300-3400 रु.