आता तुमचा गॅस सिलेंडर लवकर संपणार नाही वापरा फक्त ह्या सोप्या ट्रिक्स

नमस्कार मित्रांनो सुपर गॅसच्या रिपोर्टनुसार जेव्हा तुम्ही उच्च आचेवर स्वंयपाक करता तेव्हा जास्त गॅस वायाच जातो. जेव्हा तुम्ही कमी गॅसवर अन्न शिजवता तेव्हा २५ टक्के गॅसची बचत होते.

 

आधी भिजवून नंतर शिजवले जाणारे पदार्थ जसं की कडधान्य, तांदूळ, सोयाबीन, डाळी यामुळे इंधन वाचतं. याशिवाय पदार्थ शिजवण्यासाठी भिजवून ठेवणं तब्येतीसाठी उत्तम असते. कोणताही पदार्थ शिजवताना गरजेपेक्षा जास्त पाणी घालू नका. कारण पाणी आटवण्यात बराच गॅस वाया जातो अनेकदा अन्नही जास्त शिजते.

हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेत झाली मुदत वाढ आता खात्यात होणार 4500 हजार रुपये जमा येथे करा अर्ज

 

लहान गॅस बर्नरला ६ ते १० टक्के इंधन लागतं तुलनेने मोठ्या बर्नरर्सना जास्त गॅस लागतो.अनेकदा घाईघाईत स्वंयपाक करताना लोक ओली भांडी लोक स्टोव्हवर ठेवतात. उष्णतेमुळे भांडे पूर्णपणे सुकते. पण या पूर्ण प्रक्रियेत गॅस भरपूर वाया जातो. नेहमी स्वंयपाक करण्याआधी भांडी सुती कापडाने पुसून घ्यायला हवीत. ज्यामुळे गॅस वाचवणं सोपं होईल.प्रेशर कुकरमध्ये स्वंयपाक करणं खूपच सोपं आहे हे सर्वांनाच माहिती आहे. यामुळे गॅसची बचत होते हे खूप कमी लोकांना माहित असते. जर तुमचा गॅस लवकर संपत असेल तर जास्तीत जास्त पदार्थ प्रेशर कुकरमध्ये बनवणं फायदेशीर ठरू शकतं.

हे सुद्धा वाचा लाडकी बहीण योजनेत झाली मुदत वाढ आता खात्यात होणार 4500 हजार रुपये जमा येथे करा अर्ज

 

 

Leave a Comment