कापूस सोयाबीन अनुदानाचे दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने केले जमा येथे तपासा यादीत नाव

नमस्कार मित्रांनो राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य करण्याच्या योजनेतून आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात करण्यात आली

हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

.त्यामुळे, जास्तीत जास्त 10 हजार रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.एका क्लिकवर सुमारे 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर 2389 कोटी 93 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

 

2023 च्या खरीप हंगामात एकूण 96 लाख 787 खातेदार शेतकरी हे सोयाबीन व कापूस उत्पादक होते. त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकूण 4194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी 1548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2646 कोटी 34 लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

Leave a Comment