हे सुद्धा वाचा सरकार करणारा आता कर्मचाऱ्यांच्या खात्यात दर महिन्याला 26 हजार रुपये जमा
हे सुद्धा वाचा सरकार करणारा आता कर्मचाऱ्यांच्या खात्यात दर महिन्याला 26 हजार रुपये जमा
त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजारांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आधार क्रमांक दिलेल्या उर्वरित २४ लाख शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर लाभ देण्यात येणार आहे. तर, ९२ लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे २६ लाख शेतकरी एकतर या योजनेचा लाभ घेण्यास अनुत्सुक आहेत किंवा त्यांच्या सातबारा उताऱ्यावर नोंद असली तरी त्यांना याबाबत माहिती नाही.
या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील पिकांची नोंदणी तलाठ्यांनी एकतर प्रत्यक्षात न करता अंदाजे किंवा गेल्या वर्षाच्या नोंदीच्या आधारे केली आहे. त्यामुळे या नोंदींची सत्यता पडताळणी करणे जिकिरीचे झाले आहे.परिणामी, असे शेतकरी लाभ घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. एकट्या सातारा जिल्ह्यातील सुमारे १ लाख शेतकरी सापडत नसल्याचीही वस्तुस्थिती आहे.