शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये अनुदान झाले जमा इथे बघा लाभार्थी यादी October 13, 2024 by News नमस्कार मित्रांनो महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये ज्या शेतकर्यांनी मागील महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे अशा 11 हजार 836 शेतकर्यांच्या बँक खात्यावर 4 हजार 670 लाख रुपये रक्कम शासनामार्फत जमा करण्यात आली आहे. योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील 829 शेतकर्यांना 352 लाख रुपये, जळगांव जिल्ह्यातील 729 शेतकर्यांना 307 लाख रुपये, नाशिक जिल्ह्यातील 713 शेतकर्यांना 354 लाख रुपये तर रत्नागिरी जिल्ह्यातील 503 शेतकर्यांना 133 लाख रकमेचा लाभ देण्यात आला आहे. प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत 33 हजार 356 शेतकर्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसल्याचे शासनाच्या माहे ऑगस्ट 2024 मध्ये निदर्शनास आले होते हे सुद्धा वाचा:- दिवाळी अगोदर लाडकी बहीण यांच्या खात्यात होणार 7500 हजार रुपये जमा . त्यामुळे या शेतकर्यांना रुपये 50 हजारांपर्यंतच्या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नव्हता. या शेतकर्यांना आधार प्रमाणीकरणासाठी 12 ऑगस्ट 2024 ते 30 सप्टेंबर 2024 हा कालावधी देण्यात आला होता. हे सुद्धा वाचा:- दिवाळी अगोदर लाडकी बहीण यांच्या खात्यात होणार 7500 हजार रुपये जमा या कालावधीत आधार प्रमाणीकरण केलेल्या 11 हजार 836 शेतकर्यांच्या बँक खात्यात 46.70 कोटी रुपयांची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम 1 ऑक्टोबर 2024 रोजी वर्ग करण्यात आली आहे. तसेच जे शेतकरी आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी मृत झाले आहेत. अशा शेतकर्यांच्या वारसांची नावे योजनेच्या पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.