जुलै-ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रुपये

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत.

हे सुद्धा वाचा:- लाडका भाऊ योजनेचे पैसे या दिवशी होणार खात्यात जमा

तर ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील, त्याच महिन्याचे पैसे त्यांना मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून यापुढेही नोंदणी सुरूच राहणार आहे. मात्र यापुढे ज्या महिन्यात नोंदणी होईल, त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना लाभ मिळेल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.गडचिरोली येथील कार्यक्रमात बोलताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे पुढे म्हणाल्या, सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या योजनेसाठी राज्यातील एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत

हे सुद्धा वाचा:- लाडका भाऊ योजनेचे पैसे या दिवशी होणार खात्यात जमा

 

. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. मात्र 1 सप्टेंबरपासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. 1 सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरपासून पुढे पैसे मिळतील. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे पैसे मिळणार नसल्याचे सांगितले

Leave a Comment