लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख खात्यात होणार 4500 रुपये जमा येथे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर करण्यात आली आहे. यानंतर महिलांना अर्ज दाखल करता येणार नाहीत. या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होणार आहेत.

इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

जुलै 2024 पासून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना लागू झाली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात याची घोषणा केली होती. दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन अर्जदार महिलांच्या बँक खात्यावर एकत्रितरित्या जमा झाले.31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी 3000 रुपये खात्यात वर्ग करण्यात आले. यानंतर या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली. आता 30 सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होणार आहेत. जुलै, ऑगस्ट आमि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे हे मानधन आहे.

इथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

Leave a Comment