लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी.! लाडकी बहिण योजनेला अर्ज करण्याची आज आहे शेवटची तारीख इथे बघा अर्ज प्रक्रिया October 16, 2024October 15, 2024 by News नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्याची आज 15 ऑक्टोबर ही शेवटची संधी आहे. यापूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर ही शेटवची तारीख दिली होती.त्यानंतर मुदतवाढ करत ही तारीख 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती. हे सुध्दा वाचा:- लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार आता साडेपाच हजार रुपये जमा आज या योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. यापूर्वी महाष्ट्रातील महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतींनी अर्ज केला होता. मात्र आता तसं नाही. आता महिलांना केवळ अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज करायचा आहे. आता ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहेत, त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अट ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लडकी बहिण योजनेसाठी आता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने यावर्षी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे हे सुध्दा वाचा:- लाडक्या बहिणींच्या खात्यात होणार आता साडेपाच हजार रुपये जमा . योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. ज्या महिलांनी अद्याप या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केलेली नाही त्यांना आज म्हणजेच 15 ऑक्टोबर पर्यंत वेळ आहे.