राज्य सरकारचा मोठा निर्णय.! आता लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरावा लागणार तुम्हाला या ठिकाणी जाऊन September 7, 2024 by News नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सरकारनं आता बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. हे सुध्दा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी होणार नुकसान भरपाई जमा त्यानुसार, आता आपलं सेवा केंद्रातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येणार नाहीत.तर फक्त अंगणवाडी सेविकांनाच नव्या अर्जांची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत हे सुध्दा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात या दिवशी होणार नुकसान भरपाई जमा . राज्य सरकारनं यासंदर्भातील जीआर काढला आहे. पण यामुळं आपलं सेवा केंद्र चालकांमध्ये नाराजी पसरली आहे.आजच जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे यापुढं मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीचे काम आंगणवाडी सेविकांद्वारे होणार आहे. या योजनेसाठी नोंदणीचं काम आता मर्यादित स्वरूपात येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे, असं राज्य शासनाच्या शासन निर्णयात म्हटलं आहे.या योजनेंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. पण आता या योजनेंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्यानं फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांद्वारेच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती असंही या शासन निर्णयात म्हटलं आहे.