नागरिकांसाठी आनंदाची बातमी.! तुमच्या मुलीच्या जन्मानंतर सरकार देणार खात्यात 50 हजार रुपये इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया October 11, 2024 by News नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही मुलींसाठी खास योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५०,००० रुपये दिले जातात. हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे चौथ्या हप्त्याचे तीन हजार रुपये खात्यात झाले जमा इथे बघा यादीत नाव माझी कन्या भाग्यश्री योजना २०१६ साली सुरु केली होती. मुलींचा जन्मदर वाढावा आणि तसेच त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना पैसे दिले जातात. मुलीचा जन्म झाल्यापासून ते ती १८ वर्षाची होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते. या योजनेत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात.मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये दिले जातात. हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे चौथ्या हप्त्याचे तीन हजार रुपये खात्यात झाले जमा इथे बघा यादीत नाव मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातेत. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. म्हणजेच मुलीला एकूण १ लाख १ हाजर रुपये दिले जातात.या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो, पत्ता या गोष्टी आवश्यक आहे. याचसोबत तुमच्या उत्पन्नाचा दाखलादेखील आवश्यक आहे. या योजनेत एका घरातील फक्त २ मुलींनाच पैसे मिळणार आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या वेबसाइटवरुन तुम्हाला योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर हा फॉर्म महिला व बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागणार आहे.