वाहन चालकांसाठी खुशखबर.! आता भरावा लागणार नाही तुम्हाला इतक्या किलोमीटर पर्यंत टोल टॅक्स September 11, 2024 by News नमस्कार मित्रांनो टॅक्सी क्रमांक असलेल्या वाहनांसाठी ही सुविधा उपलब्ध नसून, खासगी वाहने असलेल्यांनाच ही सुविधा उपलब्ध होणार आहे. हे सुद्धा वाचा:- या सरकारी योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात होणार 9 हजार रुपये जमा येथे बघा अर्जप्रकिया सरकारने म्हटले आहे की जर एखादे वाहन ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) ने सुसज्ज असेल आणि ते कार्यरत असेल, तर ते वाहन महामार्गावर किंवा एक्सप्रेसवेवर दररोज 20 किमी चालविण्यासाठी टोल टॅक्स द्यावा लागणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) नियम, 2008 मध्ये सुधारणा केली आहे. GNSS ही एक प्रकारची उपग्रह प्रणाली आहे जी वाहनाच्या स्थानाबद्दल माहिती देते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 मध्ये बदलांची अधिसूचना जारी केली आहे. वाहनाने दररोज 20 किमीपेक्षा जास्त अंतर कापले तर त्याच्याकडून टोल टॅक्स वसूल केला जाईल, असे या अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. हा कर प्रत्यक्षात वाहनाने कापलेल्या अंतरानुसार असेल. महामार्ग किंवा एक्स्प्रेस वेवर एखादी कार दररोज 20 किमी चालवल्यास त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही. मात्र वाहनाने 20 किमीपेक्षा जास्त प्रवास केल्यास टोल आकारला जाईल.