ऑनलाइन वीज भरणाऱ्यांसाठी मिळणार आता इतक्या रुपयांची सूट

नमस्कार मित्रांनो राज्यातील जे वीज ग्राहक वीज बिल भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीची निवड करतात ते वीज बिलात ०.५ टक्के सूटसाठी पात्र ठरणार आहेत.

जॉईंट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन (जेईआरसी) च्या ताज्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, पेमेंट ऑनलाईन केल्यास लो-टेन्शन ग्राहकांना आणि हाय-टेन्शन ग्राहकांना अनक्रमे ०.५ टक्के आणि ०.२५ टक्केची सूट दिली जाईलगोवा वीज खाते सध्या ग्राहकांनी जर आपले वीज बिल देय तारखेच्या सात दिवस अगोदर भरले तर त्यांना १.२५ टक्के सूट देत आहे.

हे सुध्दा वाचा:- या नागरीकांना मिळणार नाही मोफत गॅस सिलेंडर

 

जेईआरसीच्या नव्या अधिसूचनेबाबत वीज खात्याच्या अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी सांगितले, आम्ही जेईआरसीच्या नवीन अधिसूचनेचा अभ्यास करून पुढील निर्णय घेऊ जेईआरसीच्या ताज्या अधिसचनेत अर्ज मंजूर करण्यासाठी कालमर्यादाही निर्दिष्ट केल्याने अल्पावधीत नवीन वीज जोडणी मिळण्यास मदत होणार आहे. गोवा आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू असलेल्या जेईआरसीच्या नव्या अधिसूचनेनुसार, ज्यांनी वीज जोडणीसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे दिलेली आहेत, त्या शहरी ग्राहकांना तीन दिवसांत कनेक्शन मिळणे आवश्यक आहे. ग्रामीण भागांत राहणाऱ्या लोकांना अर्ज भरल्याच्या तारखेपासून ३० दिवसांत विद्युत कनेक्शन मिळणार आहे

हे सुध्दा वाचा:- या नागरीकांना मिळणार नाही मोफत गॅस सिलेंडर

 

 

Leave a Comment