शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! पीक पाहणी नोंदणीसाठी 23 सप्टेंबर पर्यंत केली सरकारने मुदत वाढ September 20, 2024 by News नमस्कार मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदविता आली नाही. त्यामुळे ई-पीक पाहणी अर्थात अॅपद्वारे पिकांची नोंदणी करण्यासाठी आणखी ७ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे हे सुध्दा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार रुपये झाले जमा येथे तपासा यादी येथे क्लिक करून . पीक पाहणीसाठी यंदा दिलेल्या १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत केवळ ४६ टक्के क्षेत्रावरील पिकांचीच नोंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांनी पीक पाहणी करावी, असे आवाहन जमाबंदी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे हे सुध्दा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार रुपये झाले जमा येथे तपासा यादी येथे क्लिक करून . यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक पाहणी नोंदविण्याकरिता आता २३ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक पाहणी करता येणार नाही, अशा नोंदणीसाठी सहायक स्तरावरील पीक पाहणी २४ सप्टेंबरपासून २३ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील, कृषी विभागाच्या योजनांसाठी तसेच अनुदान वितरणासाठी ई. पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सोयाबीन व कापूस उत्पादकांना प्रति हेक्टरी ५ हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याने ही नोंदणी आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या मुदतवाढीमध्ये राहिलेल्या सर्व शेतकयांनी आपली पीक पाहणी वेळेत पूर्ण करून घ्यावी.