हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार रुपये होणार या दिवशी जमा
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या २४ तासात प्रामुख्याने विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव पावसात न्हाऊन निघणार असे म्हणायला हरकत नाही. तर संपूर्ण राज्यातच गौराईच्या आगमनाला पावसाची हजेरी असंणार यात शंका नाही.
विदर्भाची राजधानी आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरसह भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. तर, कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.