शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पुढील पाच दिवस पडणार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस

नमस्कार मित्रांनो पुढील 5 दिवस म्हणजे मंगळवार 16 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिकअहमदनगरपुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा 18 जिल्ह्यात व विदर्भात 13 ते 15 ऑक्टोबर (3 दिवस) 11 जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.

 

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेत झाली मुदतवाढ या तारखेपर्यंत करता येणार आता अर्ज

 

त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना वाफसा असेल त्या शेतकऱ्यांनी पावसाची विशेष भीती न बाळगता शेतीची काम उरकण्यास हरकत नसल्याचे मत खुळे यांनी व्यक्त केले. बुधवार दिनांक 17 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात पुन्हा काहीसं पावसाळी वातावरण चित्रित होण्याची शक्यता जाणवते. शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा बियाणं 12 ऑक्टोबर नंतरच टाकण्यास हरकत नसल्याचे खुळे म्हणाले. 12 किंवा 18 ऑक्टोबर नंतर जरी किरकोळ पाऊस झाला तरी हुळं उताराला विशेष अपायकराकता जाणवणार नाही.5 ऑक्टोबरला परतीच्या वाटेवरील मान्सून अजूनही केवळ महाराष्ट्र राज्याच्या उंबरठ्यावर म्हणजे नंदुरबार पर्यंत येऊन थांबलेला आहे. आज सप्ताह उलटला तरी अजुन तो नंदुरबारमध्येच उभा आहे. अर्थात त्याच्या पुढील वाटचालीस अनुकूलता असली तरी प्रत्यक्षात जेव्हा तो जाग्यावरून हलेल, तेव्हाच महाराष्ट्रातील परतीच्या पावसाबाबत बोलणं योग्य ठरेल असे माणिकराव खुळे म्हणाले.

हे सुद्धा वाचा:- लाडकी बहीण योजनेत झाली मुदतवाढ या तारखेपर्यंत करता येणार आता अर्ज

 

Leave a Comment