महावितरणाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना मिळणार आता मोफत 25 वर्षे वीज इथे जाणून घ्या अर्ज प्रक्रिया October 6, 2024 by News नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना सिंचनासाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा संपूर्ण संच देणाऱ्या मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या अंतर्गत राज्यातील तब्बल ५० हजार शेतकऱ्यांच्या शेतावर सौरपंप बसविण्यात आले आहेत. हे सुध्दा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार रुपये झाले जमा येथे यादीत नाव बघा केवळ सहा महिन्यांतच महावितरणने शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत सर्वसाधारण शेतकऱ्यांना दहा टक्के तर अनुसूचित जाती, जमातींच्या शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो.उर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून मिळते. दिवसा वीजपुरवठा आणि लोडशेडिंग किंवा बिलाची चिंता नाही, असे सौर कृषी पंपांचे वैशिष्ट्य असल्याने शेतकऱ्यांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरली आहे.केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री कुसुम बी या योजनेच्या आधारे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. हे सुध्दा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात 4 हजार रुपये झाले जमा येथे यादीत नाव बघा त्यानुसार महावितरणकडे फेब्रुवारीत २ लाख ७० हजार अर्ज प्राप्त झाले होतेमहावितरणने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू केली असून त्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर नव्याने दाखल झालेल्या अर्जावरही काम सुरू आहे.राज्य सरकारने दहा लाख सौर कृषी पंप बसविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात.सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसविला की, शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते..