हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार रुपये या दिवशी होणार जमा
यासाठी पंचायत समिती कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन जालना जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर पर्यंत कृषी यंत्रांसाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून जिल्हा परिषद उपकर योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे 50 टक्के अनुदानावर कृषी औजारांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत पंचायत समितीमध्ये यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.कृषी औजारांमध्ये 50 एचपीचा ट्रॅक्टर, कडबाकुटी, ट्रॅक्टरचलित पल्टीनांगर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर आणि पीव्हीसी पाइप यांचा समावेश आहे.
हे सुध्दा वाचा:- लाडकी बहीण योजनेचे 4500 हजार रुपये या दिवशी होणार जमा