आता बँकेत न जाता घरबसल्या जमा करता येणार कॅश पैसे सरकार ने सुरू केली ही नवीन सुविधा

नमस्कार मित्रांनो आतापर्यंत तुम्ही युपीआय पेमेंटच्या मदतीने एखाद्याला पैसे पाठवू शकत होतात. पण आता तुम्ही युपीआयच्या मदतीने तुमच्या बँक खात्यातही पैसे जमा करू शकता. त्यामुळे तुम्हाला बँकेत जाण्याची गरज लागणार नाही. केवळ ॲपच्या मदतीने हे काम होणार आहे.

हे सुद्धा वाचा:- महिलांच्या खात्यात होणार आता 5000 जमा आजच करा इथे अर्ज

 

आता युपीआयच्या मदतीने तुमच्या बँक खात्यातही पैसे जमा करता येणार आहेत. यासाठी तुम्हाला आधी तुम्हाला कॅश डिपॉझिट मशीनवर जावे लागेल. तुम्हाला या मशीनवर क्यूआर कोड दिसू लागेल. त्याच्या मदतीने तुम्ही पेमेंट जमा करू शकाल. त्यानंतर तुम्हाला युपीआय ॲप उघडावे लागेल. इथे जाऊन तुम्हाला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. युपीआय ॲपवर स्कॅन केल्यानंतर तुम्ही जमा करणार होता तेवढीच रक्कम तुम्हाला दिसेल. शेवटी तुम्हाला पैसे जमा करण्याचे बँक खाते निवडावे लागेल. यामध्ये तुम्ही जो युपीआय पिन वापराल तुमचे पैसे त्याच बँक खात्यात पोहोचतील.स्टेट बँक ऑफ इंडियाने, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी यासह अनेक बँका आहेत ज्या युपीआयच्या मदतीने पैसे जमा करण्याचा पर्याय देतात. अलीकडे युनियन बँकेनेही हा पर्याय सुरू केला आहे. जे युजर सहज पेमेंट करू इच्छितात त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. याशिवाय यामध्ये अनेक खास फिचर्स देखील देण्यात आले आहेत. यामुळे युजर्संचा बराच वेळही वाचतो.

Leave a Comment