पंजाबराव डक यांचा शेतकऱ्यांना मोठा इशारा.! या तारखेपासून राज्यात पडणार पुन्हा जोरदार पाऊस October 1, 2024 by News नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी महाराष्ट्रातील हवामानाचे अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात काही दिवस हवामान कोरडे असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातून सरदार पावसाला सुरुवात होणार आहे. मागील आठवड्यात महाराष्ट्रात चांगलाच मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला. त्यानंतर मागे दोन-तीन दिवसापासून पावसाने काहीशा प्रमाणात विश्रांती घेतलेली आहे. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीन अनुदानाचे दहा हजार रुपये झाले जमा येथे यादीत नाव बघा अगदी काही ठिकाणी पाऊस पडताना दिसत आहे. परंतु महाराष्ट्रात जास्त पावसाची कुठेही तीन-चार दिवसात नोंद झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या कामाला सुरुवात केलेली आहे. अनेक पिकांची काढणी सध्या चालू झालेली आहे. सोयाबीन, उडीद यांसारख्या पिकांची काढणी चालू झालेली आहे. तसेच कापूस वेचणीला सुरुवात झालेली आहे. अशातच पंजाबराव यांनी अंदाज देत राज्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीन अनुदानाचे दहा हजार रुपये झाले जमा येथे यादीत नाव बघा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 5 ऑक्टोबर पर्यंत हवामान कोरडे असणार आहे. परंतु त्यानंतर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहेमहाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे बदलणार आहे.राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक स्थिती निर्माण होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे 6 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर या तीन दिवसांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे पाच-सहा दिवसांमध्ये पिकांची काढणी करून ते सुरक्षित ठिकाणी ठेवावी अशी माहिती देण्यात आलेली आहे. पंजाबराव आणि महाराष्ट्र सोबतच मध्य प्रदेशात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी देखील शेतीची कामे उरकून घ्यावी तसेच सल्ला देण्यात आलेला आहे.